दिवाळी बोनस साठी प्रशासन निवडणूक आयोगाकडे पाठवणार प्रस्ताव. Employees Diwali Bonus.
Employees Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून काही रक्कम दरवर्षी देण्यात येते. या वर्षी मात्र महामंडळाच्या निधी मागणीच्या प्रस्तावावर सरकारकडून कुठलाच निर्णय अद्याप न झाल्याने या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारातच आहे.
यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असताना एसटी महामंडळाकडून निवडणूक आयोगाकडे कर्मचा-यांच्या दिवाळी भेट पूर्ततेबाबत ८ नोव्हेंबर रोजी प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.
दिवाळी या आनंद उत्सवात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना एसटी कर्मचारी मात्र तुटपुंज्या रकमेत यंदाची दिवाळी साजरी करत आहेत. गेल्या वर्षी सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना ५,००० इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात आली होती. Employees Diwali Bonus
या वर्षी महामंडळाने कर्मचारी व अधिकारी यांना सरसकट ६,००० रुपये रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यासाठी आचार संहिता लागू होण्याअगोदर म्हणजेच १५ ऑक्टोबर रोजी ५२ कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. या प्रस्तावासंदर्भात महामंडळाने सरकारकडे निधी मिळावा, यासाठी वारंवार विचारणा केली.
मात्र, अद्याप कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटी बाबत कोणताच निर्णय झाला नसल्याने राज्यभरात एसटी कर्मचारी वर्गात नाराजी पसरली आहे. याच पाश्र्वभूमीवर एसटी महामंडळाकडून निवडणूक आयोगाकडे कर्मचान्यांची आचार संहितेमुळे अडकलेली दिवाळी भेट मार्गी लावण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. Employees Diwali Bonus