EPS-95 मध्ये किमान पेन्शन वाढणार , फेब्रुवारीमध्ये कामगार मंत्राल्याची बैठक- मासिक पेन्शन किती असेल जाणून घ्या…
Created by khushi 19 December
EPS 95 new update नमस्कार मित्रांनो आमच्या या आजच्या लेखात आपला स्वागत आहे. मित्रांनो तुमच्या माहिती साठी आम्ही सांगतो कि येत्या नवीन वर्षात सरकार बरंच काही बदलणार आहे. ज्यामध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांचे वीज बिल माफ होणार, जनतेसाठी नवीन MSRTC कडून बसेस सुरु करण्यात येणार. त्याच बरोबर कर्मचाऱ्यांची पेंशन वाढणार, DA हि वाढणार. येत्या नवीन वर्ष कर्मचाऱ्यांसाठी आनंदाई ठरेल अशी आशा आहे. चला पाहूया संपूर्ण माहिती अगदी विस्ताराने,
.EPS 95 new update कर्मचारी पेन्शन योजनेतील पेन्शनधारकांच्या मागणीवरून सरकारने हे पाऊल उचलले आहे. निवृत्ती वेतनात वाढ करावी, अशी त्यांची अनेक दिवसांपासून मागणी होती. अशी बातमी समोर आली आहे कि फेब्रुवारीमध्ये कामगार मंत्रालयाची महत्त्वपूर्ण बैठक होऊ शकते, आणि या बैठकीत संसदेच्या स्थायी समितीच्या शिफारशींवर मोठा निर्णय हि घेतला जाऊ शकतो. कामगार मंत्रालयाच्या या बैठकीत नवीन वेतन संहितेबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो.
जाणून घ्या,काय आहे ही कर्मचारी पेन्शन योजना?
EPFO अंतर्गत भविष्य निर्वाह निधी प्राप्त करणाऱ्या सर्व सदस्यांसाठी कर्मचारी पेन्शन योजना आहे. यामध्ये संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना वयाच्या ५८ वर्षानंतर ईपीएस पेन्शन (पेन्शन फंड) मिळते. यासाठी कर्मचाऱ्याला किमान 10 वर्षे काम करणे बंधनकारक आहे.EPS 95 new update
ज्यावेळेस एखादा कर्मचारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा सदस्य बनतो, तेव्हा तो कर्मचारी पेन्शन योजनेचाही सदस्य होतो. कर्मचारी त्याच्या पगाराच्या १२% EPF मध्ये जमा करतो आणि नियोक्ता देखील तेवढीच रक्कम देतो. परंतु, ईपीएस पेन्शन (पेन्शन फंड) नियोक्ताच्या योगदानाचा एक भाग ईपीएसमध्ये जमा केला जातो.
EPS-95 चे योगदान 8.33%
EPS पेन्शन फंड खात्यातील योगदान पगाराच्या 8.33% आहे. मात्र, सध्या कमाल पेन्शनपात्र पगार केवळ १५ हजार रुपये मानला जातो. यामुळे, पेन्शनचा हिस्सा जास्तीत जास्त 1250 रुपये प्रति महिना आहे. या नुसार , किमान पेन्शन 1000 रुपये आणि कमाल 7,500 रुपये आहे. EPS 95 new updateया कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेत विधवा निवृत्ती वेतन, मुलांचे पेन्शन अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोकरीवर असताना कर्मचाऱ्याचा वयाच्या 58 वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास त्याची पत्नी आणि मुलांना पेन्शन मिळते.
कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याच्या अटी
- कर्मचारी ईपीएफचा सदस्य असणे आवश्यक आहे.
- नोकरीचा कालावधी किमान 10 वर्षांचा असावा.EPS 95 new update
- कर्मचाऱ्याचे वय किमान ५८ वर्षे असावे.
- EPS पेन्शन (पेन्शन फंड) घेण्याचा पर्याय वयाची 50 वर्षे पूर्ण केल्यानंतर आणि 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही निवडला जाऊ शकतो. पण, अशा परिस्थितीत तुम्हाला कमी पेन्शन मिळेल. यासाठी फॉर्म 10D भरावा लागेल.
- कर्मचारी 58 वर्षे पूर्ण केल्यानंतरही EPS मध्ये योगदान देऊ शकतो, आणि 58 वर्षे किंवा 60 वर्षे वयापासून पेन्शन सुरू करू शकतो.
- जर वयाच्या ६० व्या वर्षापासून निवृत्ती वेतन सुरू केले असेल, तर पुढे ढकललेल्या 2 वर्षांसाठी निवृत्तीवेतन वार्षिक 4% दराने वाढते.
- एखाद्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळण्याचा हक्क आहे.
- कर्मचारी पेन्शन योजनेत, जर एखाद्या कर्मचाऱ्याची सेवा 10 वर्षांपेक्षा कमी असेल, तर त्याला वयाच्या 58 व्या वर्षी पेन्शनची रक्कम काढण्याचा पर्याय मिळतो.EPS 95 new update
कर्मचारी पेन्शन योजनेत म्हणजे EPS-95 मध्ये किमान पेन्शन वाढेल का?
किमान पेन्शन 1000 रुपयांवरून वाढवण्याची मागणी होत आहे. मार्च 2021 मध्ये, संसदेच्या स्थायी समितीने किमान EPS पेन्शन (पेन्शन फंड) रक्कम 1000 रुपयांवरून 3000 रुपये करण्याची शिफारस केली होती. मात्र, पेन्शनची रक्कम अत्यल्प असून, ती किमान 9000 रुपये करावी, अशी मागणी निवृत्ती वेतनधारक करत आहेत. तरच निवृत्ती वेतनधारकांना कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेचा खरा लाभ मिळेल.EPS 95 new update